Flooded roads in Vasai-Virar after heavy rain, citizens struggle to commute Saam Tv
Video

Heavy Rain Mumbai: वसई-विरारसह मीराभाईंदर शहरात पावसाचा धुमाकूळ; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Mumbai Monsoon Havoc: वसई-विरार आणि मीराभाईंदर शहरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Omkar Sonawane

मुंबईसह वसई-विरार आणि मीराभाईंदर शहरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांसह चाकरमानी व शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विरार पूर्वेकडील विवा मार्ग, नारंगी रोड, एमबी स्टेट, जैन मंदिर रोड, नालासोपारा रोड, प्रगती नगर, बोळींज रोड, वसई फाटा अशा प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिणामी वाहनचालकांचीही मोठी तारांबळ होत असून वाहतूक कोंडीचे चित्र दिसत आहे.

शहरातील विविध भागांत पालिकेची पाणी उपसा यंत्रणा बसवलेली असली तरी ती कार्यान्वित नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यातून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT