Harshavardha Jadhav saam tv
Video

VIDEO : भाजपने घर फोडलं, नवऱ्याविरुद्ध बायकोला निवडणुकीला उभं करण्याचं पाप केलं, हर्षवर्धन जाधव संतापले

Harshavardhan Jadhav criticizes BJP : हर्षवर्धन जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने आमचे घर फोडले असा आरोपही त्यांनी केला.

Nandkumar Joshi

भाजपने घर फोडले असून, नवऱ्याविरुद्ध बायकोला निवडणुकीत उभं करण्याचं पाप भाजपने केल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. तसंच यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांनाही लक्ष्य केलं.

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आपली पत्नीच निवडणुकीत विरोधात उभी राहिल्यानंतर पहिल्यांदाच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.

नवऱ्याविरुद्ध बायकोला उभं करण्याचे पाप भाजपने केले आहे. भाजपने घर फोडले. या सगळ्याच्या पाठीमागे रावसाहेब दानवे आहेत, असा घणाघाती आरोपही जाधव यांनी केला. लोक कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतात, इकडे माझी बायको माझ्याविरोधात उभी आहे. धर्मयुद्ध आहे, ठोकून काढू, असा इशाराही हर्षवर्धन जाधवांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जुन्या मुंबई पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Karlyache Kaap: कारल्याची कडू भाजी सोडा, बनवा कुरकुरीत काप; सोपी रेसिपी करा ट्राय

Operation Cy-Hunt : 'ऑपरेशन साय-हंट'! एकाच दिवशी २६३ गुन्हेगारांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Jio-Airtel लांब, आता BSNL ची एन्ट्री! मुंबई मेट्रो ३ मध्ये मोबाईल नेटवर्कची अडचण सुटणार का?

Trendy Blouse Designs For Bride: यंदा कर्तव्य आहे? मग 'या' ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्समध्ये तुमचा ब्राइडल लुक करा खास

SCROLL FOR NEXT