जळगाव जिल्हा दूध संघाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांचे दूध घेतलं जात नाही, शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान दिले जात नाही, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असेल तर सत्ता असून काय करायचं.. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यशाळेत भाषण करताना संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसतील तर राजीनामा द्यायच्या तयारीत असल्याचं म्हणत जिल्हा दूध संघाच्या सत्ताधारी संचालक मंडळासह जिल्हाध्यक्ष संघाच्या प्रशासनाला गुलाबराव पाटील यांनी इशाराच दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.