Guardian Minister saam tv
Video

Maharashtra Politics: रायगड-नाशिक पालकमंत्री तिढा सुटला? झेंडावंदनाने पुन्हा वाढली चर्चा|VIDEO

Guardian Minister Row: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण 1 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात झेंडावंदनाचा मान गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. पूर्ण बहुमताने सरकार प्रस्थापित होऊन देखील दोन महिन्यांनी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली. यामध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांना दिल्यात आल्यान शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे कमालीचे नाराज झाले होते. तसेच नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागल्याने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील बोलून दाखवले की पालकमंत्री हा स्थानिक पाहिजे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या काही तासातच हा या निर्णयाला स्थगिती दिली. ही स्थगिती अद्यापही कायम असल्यामुळे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कोणाला मिळेल हा प्रश्न कायम आहे.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थित राहून झेंडावंदन करावे असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. नाशिक येथे गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे तर रायगड येथे अदिती तटकरे या उपस्थित राहणार आहे. यामुळे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे कमालीचे नाराज झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: e-KYC ची मुदत 30 एप्रिलला संपली; 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

SCROLL FOR NEXT