Guardian Minister Abdul Sattar Saam Tv
Video

VIDEO: "पुढील ९० दिवसांत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार", पालकमंत्री Abdul Sattar यांचा वादा!

Guardian Minister Abdul Sattar Welcome In Chhatrapati Sambhajinagar: पालकमंत्री पद मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार स्वागत झाले. पुढील ९० दिवसांत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

Rohini Gudaghe

मुंबई: छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार शहरात दाखल झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केलं. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. या जिल्ह्यात असताना पाचवेळा मंत्रिपद मिळालं, पण पालकमंत्री पद मिळालं नव्हतं. आज मी छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री आहे. यापूर्वी झालेले पालकमंत्री औरंगाबादचे पालकमंत्री होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मला ही संधी दिलीय. कमी ओव्हर आहेत, पण या कमी ओव्हरमध्ये शहराचे, जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुढील ९० दिवसांत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. सर्वांशी विचार विनिमय करूनच निर्णय घेण्यात आलाय. भाजप आणि शिवसेना आमदार यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT