Despite record-high gold prices, Jalgaon’s jewellery markets are packed with festive buyers ahead of Laxmi Pujan Saam Tv
Video

Gold Price Hike: लक्ष्मीपुजनाच्या आधी सोनं महागलं तरी सराफ बाजारात झुंबड का? VIDEO

Gold And Silver Prices: ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले असतानाही जळगावच्या सुवर्णनगरीत खरेदीसाठी नागरिकांचा ओघ वाढला आहे.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

दिवाळीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या बाजारात चांगलीच लगबग पाहायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तानिमित्त सोने-चांदी खरेदीसाठी नागरिकांची पसंती दिसून येते आहे. महालक्ष्मीच्या सोन्या-चांदीच्या आकर्षक मूर्तींसह कॉईन आणि दागिन्यांची खरेदी करण्यासाठी सुवर्ण दुकाने आणि प्रतिष्ठानांमध्ये ग्राहकांचा ओघ अखंड सुरू आहे.

मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्या-चांदीच्या दरात तब्बल विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षी सोन्याचा दर 80 हजार रुपयांच्या घरात होता. तर यंदा तो 1 लाख 31 हजारांवर पोहोचला असून तब्बल 51 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा दर मागील वर्षी 96 हजार रुपये होता. परंतु सध्या तो 78 हजारांनी वाढून तब्बल 1 लाख 74 हजार रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

या भाववाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार वर्गाने मात्र, सोन्या-चांदीतील गुंतवणूक वाढविली आहे. अनेक ग्राहक सणासुदीच्या शुभमुहूर्ताचा फायदा घेत लहान प्रमाणात गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. लक्ष्मीपूजनासाठी महालक्ष्मीच्या चांदीच्या मूर्ती, सोने-चांदीचे नाणे, तसेच शुभचिन्हांच्या वस्तू खरेदीला विशेष मागणी आहे. शहरात सणाचा उत्साह चांगलाच ओसंडून वाहत असून, सोन्याच्या दरातील वाढ असूनही जळगावची सुवर्णनगरी पुन्हा एकदा चमकू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Sheera Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग आजचं घरी बनवा हॉटेल स्टाईल मूग डाळ शीर

Rapid Weight Gain: वजन झपाट्याने वाढत चाललंय; थांबा आताच व्हा सावध, होतील 'हे' गंभीर आजार

Nagpur Tourism : पक्षीप्रेमींसाठी नागपूरमधील बेस्ट लोकेशन, एकदा नक्की भेट द्या

Monday Horoscope: लक्ष्मीच्या कृपेमुळे पैशाची चणचण दूर होणार, दिवाळीत या राशींच्या व्यक्तींचे नशीब उजळणार

Monday Horoscope : दिवाळी चांगली जाईल, मनातील इच्छा पूर्ण होणार; 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT