: कोल्हापूरच्या राजारामपुरीच्या शाहुमिल कॉलनीमध्ये ६२  Saam tv
Video

Maharashtra GBS Update: GBS मुळे चिंता वाढली! कोल्हापूरमध्ये तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू; राज्यातील मृतांचा आकडा १३ वर

Third Death Of GBS Patient In Kolhapur: कोल्हापूरच्या राजारामपुरीच्या शाहुमिल कॉलनीमध्ये ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमध्ये हा जीबीएसचा तिसरा बळी आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंता वाढली आहे.

Priya More

राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात जीबीएस आजार हातपाय पसरताना दिसत आहे. पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर धुळेनंतर कोल्हापूरमध्ये या आजाराने नागरिकांची भीती वाढवली आहे. कोल्हापूरमध्ये जीबीएस आजाराने आणखी एकाचा बळी घेतला आहे. कोल्हापूरमध्ये या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ वर पोहचली आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या भीती पसरली आहे.

कोल्हापूरच्या राजारामपुरीच्या शाहुमिल कॉलनीमध्ये ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याआधी रेंदाळ ढोणेवाडी येथे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला होता. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामधील एक जण व्हेंटिलेटरवर आहे.

राज्यातील जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १३ वर पोहचला आहे. शनिवारी सांगलीमध्ये दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पुण्यामध्ये जीबीएस आजारामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरमयान, नागपूरमध्ये जीबीएसचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. ७ वर्षांच्या मुलाला या आजाराची लागण झाली आहे. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिनाभरात १० रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील ५ रूग्ण नागपुरातील, दोन रूग्ण मध्यप्रदेश तर तीन रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आलेल्या रुग्णात १० रुग्णांपैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला तर ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या तीन रुग्ण उपचार घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT