Crowds rush for railway ticket bookings ahead of Ganeshotsav festival to travel from Mumbai to Konkan. Saam Tv
Video

Ganeshotsav 2025: गणपतीसाठी कोकणात जायचंय? रेल्वे तिकिटांचं बुकिंग आजपासून सुरू|VIDEO

Indian Railways Begins Advance Booking for Ganpati Festival : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे तिकिट बुकिंग आजपासून सुरू झालं आहे.

Omkar Sonawane

मुंबई: गणेशोत्सव सणाची चाहूल लागली आहे आणि कोकणातील गावाकडे जाण्याची लगबगही सुरू झाली आहे. मुंबईसह अन्य शहरी भागांमध्ये स्थायिक असलेल्या कोकणातील नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे ही पहिली पसंती असते. यंदाही गणपती सणासाठी रेल्वे तिकिटांची मागणी वाढणार असून, त्यासाठीचे बुकिंग आजपासून (२३ जून) सुरू झाले आहे.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, रेल्वे प्रवासासाठी दोन महिन्यांपूर्वी आरक्षण करता येते. त्यामुळे गणपतीसाठी २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाण्याची योजना असलेल्या प्रवाशांनी आता तिकिट आरक्षण सुरू करावं.

कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढाओढ होण्याची शक्यता

दरवर्षीप्रमाणेच यंदाही कोकणात जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक गणपती साजरा करण्यासाठी गावी जातात. त्यामुळे रेल्वे तिकिट मिळवण्यासाठी प्रवाशांनी वेळेत बुकिंग करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ऑनलाइन आणि काउंटर बुकिंग दोन्ही पर्याय उपलब्ध

रेल्वे तिकिट बुकिंगसाठी IRCTC ची अधिकृत वेबसाइट (www.irctc.co.in) वापरता येईल. तसेच, नजीकच्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण काउंटरवर जाऊनही तिकिटं आरक्षित करता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT