Ganesh Naik Shrikant Shinde and Eknath Shinde navi Mumbai municipal Election  saam tv
Video

श्रीकांत शिंदेंनी वय काढलं, गणेश नाईकांनी बाप काढला; म्हणाले, माझ्यासोबत अर्धा तास चालायला सांग....VIDEO

Ganesh Naik vs Eknath Shinde : नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. यावरून खासदार श्रीकांत शिंदेंनी नाव न घेता गणेश नाईकांच्या वयावरून टिप्पणी केली होती. त्याला आता गणेश नाईकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Saam Tv

Navi Mumbai Election : नवी मुंबईत भाजप आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढत आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप विरुद्ध शिंदेसेना अशीच सुरू आहे. गणेश नाईकांकडून सातत्याने एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले जात असल्याचे दिसते. एकनाथ शिंदेंच्या टांगा पलटी, घोडे फरारच्या टीकेला गणेश नाईकांनी तुमचाच टांगा पलटी करू, असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर अनेकदा प्रचारसभांमध्ये गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंवर टीकेचा बाण सोडून घायाळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात प्रसारमाध्यमांनी गणेश नाईकांकडून सातत्याने एकनाथ शिंदेंवर टीका केली जात असल्याकडे लक्ष वेधले असता, एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता वयानुसार प्रॉब्लेम होतो, असा टोला लगावला होता. या टोल्यानंतर गणेश नाईकांनी श्रीकांत शिंदेंना थेट आव्हान दिले आहे. माझ्या वयाबद्दल बोलण्यापेक्षा तुमच्या वडिलांना माझ्यासोबत नॉनस्टॉप चालायला सांग, मी हरलो तर राजकारण सोडून देईन, असं प्रतिआव्हान गणेश नाईक यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: विरोधी पक्षातील नेतेही अशोक खरातकडे जायचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उच्चस्तरीय बैठक सुरू; जागतिक घडामोडींना वेग|VIDEO

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये टॉवर लाईनवरून शेतकऱ्यांचा संताप; आत्मदहनाचा इशारा

Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, २ महिन्यांनंतर सोनं दीड लाखांच्या खाली

महाराष्ट्रात शासनमान्य गुटखा निर्मिती? सचिवाच्या भूमिकेमुळे प्रकरण थेट कोर्टात

SCROLL FOR NEXT