Ganesh Gallicha Raja Visarjan Miravnuk Saam Tv
Video

VIDEO: 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', गणशगल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

Ganesh Gallicha Raja Visarjan Miravnuk: गणेशगल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. बाप्पा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.

Priya More

'मुंबईचा राजा' म्हणून ओळख असलेला गणेशगल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. गणेशगल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. सर्वात आधी मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात होते. त्यानंतर इतर गणपती हळूहळू विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. गणेशगल्लीच्या राजाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरात आणि गुलालाची उधळ करत बाप्पाला निरोप दिला जात आहे. गणेशगल्लीचा राजा यंदा उज्जैनच्या महाकाल नगरीमध्ये विराजमान झाला होता. या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आता बाप्पा विसर्जनासाठी निघाले असून त्यांना निरोप देण्यासाठी देखील गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhruv Rathee : "पोलिसांनी माझं अपहरण केलं..." 'त्या' दिवशी काय घडलं? ध्रुव राठीने सर्व सांगितलं; पाहा VIDEO

Kalyan-Latur Highway: मुंबईवरून लातूरला पोहचा फक्त ५ तासांत, तयार होतोय नवा एक्स्प्रेस वे; कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार?

Chanakya Niti : ऑफिसमध्ये प्रत्येकाच्या आवडीचे असतात असे लोक; त्यांच्यात असतात हे ७ खास गुण

Maharashtra News Live Update: ओबीसी हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी नागपुरात राष्ट्रीय रणनीती बैठकीला सुरुवात

PF मधून पैसे काढणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! TDS सवलतीसाठी आता भरावा लागणार नवीन फॉर्म

SCROLL FOR NEXT