Gadchiroli Flood  Saam Tv
Video

VIDEO: गडचिरोली- भंडारामध्ये पूरस्थिती कायम, वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर; २५ गावांचा संपर्क तुटलेला

Gadchiroli And Bhandara Flood: गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला पूर आला आहे. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Priya More

गडचिरोलीच्या भामरागडमधील वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती तिसऱ्या दिवशीही कायम आहे. हळूहळू पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीने पात्र सोडले आहे. परिणामी शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी, आल्लापल्ली-भामरागड या तीन राष्ट्रीय महामार्गसह आरमोरी - रामाळा हा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. गोसेखुर्द धरणातून आताही १२ ते १४ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गडचिरोलीतील पूरस्थिती आज दिवसभर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी दुपारपासून पाऊस थांबला असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गडचिरोलीपाठोपाठ भंडारा जिल्ह्यातही तिच परिस्थिती आहे. भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. भंडारा जिल्ह्यातील जीवनदायी समजली जाणारी वैनगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे. भंडारा तालुक्यातील खमारी गावाजवळील छोटा पूल हा पाण्याखाली गेला असून जवळपास २५ गावांचा संपर्क तुटलेला आहे.

नाल्यावरील पुलावरून तीन ते चार फूटांपर्यंत पाणी वाहत आहे. असे असताना सुद्धा काही नागरिक आपला जीव धोक्यामध्ये घालून या पाण्यातून दुचाकी, सायकल आणि पायी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचे चित्र दिसत आहे. तर महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या बावनथडी नदीला सुद्धा पूर आल्यामुळे दोन्ही राज्याच्या संपर्क तुटलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT