Kalyan Dombivli Saam
Video

ठाकरेंच्या शिवसेनेचे ४ नगरसेवक नॉट रिचेबल, थेट पोलिसांमध्ये तक्रार, कल्याणमध्ये नेमकं काय चाललेय?

Kalyan Dombivli political news : कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट-रिचेबल झाल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे. नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून निष्पक्ष तपास आणि तातडीच्या शोधमोहीमेची मागणी करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल; शोधासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार

Shiv Sena UBT corporators news : कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट-रिचेबल झाल्याने थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे. (Shiv Sena UBT corporators missing news update)

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी चार नगरसेवक सध्या नॉट-रिचेबल आहेत. यातील मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती राजन डोणे हे दोन नगरसेवक 16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असल्याने कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अपहरण, दबाव किंवा फसवणुकीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपास करून तातडीने शोधमोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या,असे आवाहन शरद पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Bank Holiday: कामाची बातमी! आजपासून सलग ४ दिवस बँकांना सुट्ट्या; शाळांचं काय? वाचा सविस्तर

Laptop Care Tips : लॅपटॉपची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

IND vs NZ: सूर्याला इशान किशनचा राग का आला होता? सामन्यानंतर भारताच्या कर्णधाराने केला खुलासा

Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; तीन महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं

SCROLL FOR NEXT