Marathwada SAAM TV
Video

Marathwada : १५०० कोटींपेक्षा अधिक निधी, पण शेतकऱ्यांना KYC नंतरच मदत, पुरानंतर पुराव्याचं संकट? | VIDEO

Farmers Loss Due To Floods : राज्यातल्या शेतकऱ्यांवर पुरानंतर आता पुराव्यांचं संकट उभं ठाकलंय आहे. बँकांच्या पडताळणीनंतरच शेतकऱ्यांना मदत देण्याचे संकेत मिळाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुरामुळे मोठं नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी सरकारकडून प्राप्त झाला आहे. मात्र ही मदत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार , पंचनामा केल्यानंतरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या बँकेत जाऊन ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांची ओळख पडताळल्यानंतरच बँका ही रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करतील. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही मदत असली तरी ‘केवायसी’ ची अट असल्याने शेतकऱ्यांना बँकांपर्यंत धाव घ्यावी लागणार आहे. पूराच्या दुहेरी संकटानंतर आता कागदोपत्री प्रक्रिया शेतकऱ्यांसमोर आणखी एक आव्हान उभं करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PCOS misconceptions: PCOS विषयी महिलांच्या मनात असतात 'या' गैरसमजुती; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Central Government Bonus: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवळीचं गिफ्ट, महिन्याच्या पगाराइतका मिळणार बोनस, वाचा पात्रता अन् अटी?

First Mobile Phone: 1 किलो वजनाचा मोबाईल अन् 10 तास चार्जिंग; वाचा रंजक इतिहास

Maharashtra Farmer : स्कायमेट वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवले, अकोल्यात २ हजार शेतकऱ्यांचं नुकसान

SCROLL FOR NEXT