Nirmala Sitharaman SaamTv
Video

Budget 2025 : अर्थमंत्र्यांकडून बजेट सादर करण्यास सुरुवात; कृषी क्षेत्रात विकासाला देणार प्राधान्य | Video

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली आहे. सरकार तूर, उडीद आणि मसूर यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

Saam Tv

संसद भवनात आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून २०२५ चा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यात सरकार तूर, उडीद आणि मसूर यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नोंदणीकृत आणि केंद्रीय एजन्सींशी करार केलेल्या शेतकऱ्यांनी ४ वर्षांच्या कालावधीत आणलेल्या डाळी एजन्सी खरेदी करतील, असं अर्थमंत्र्यांनी म्हंटलं आहे. तसंच मेक इन इंडिया, रोजगार आणि नवोन्मेष, ऊर्जा पुरवठा, क्रीडा विकास, एमएसएमईचा विकास याचा विकास प्रवासात समावेश केला जाणार आहे. यामुळे १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करण्यास देखील सुरूवात केली जाणार आहे. कौशल्य आणि गुंतवणूक शेतीमध्ये रोजगार वाढवेल. तरुण शेतकरी, ग्रामीण महिला, शेतकरी आणि लहान शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं आहे. १०० विकसनशील कृषी जिल्ह्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात होईल. राष्ट्रीय तेल अभियान राबवून खाद्यतेलात स्वयंपूर्णता मिळवली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT