Chalisgaon Farmers Agitate Over Petrol Diesel Supply Restrictions saam tv
Video

पेट्रोलसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको; कॅन घेऊन रस्त्यावरच मांडला ठिय्या, VIDEO

chalisgaon farmers protest over petrol diesel shortage : चाळीसगावमध्ये पेट्रोल-डीझेलसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. जळगाव चांदवड रस्ता शेतकऱ्यांनी अडवला.

Nandkumar Joshi

संजय महाजन, जळगाव | साम टीव्ही

राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल-डीझेल टंचाईचा सामना करावा लागत आहे. काल बुलढाण्यातील लोणारमध्ये पेट्रोल पंपावर डीझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती. हातात कॅन घेऊन शेतकरी पंपाकडे पळत सुटल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसून आले होते. इंधन टंचाईचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आता चाळीसगावमध्ये शेतकऱ्यांनी पेट्रोल-डीझेलसाठी चक्क आंदोलन केले. कॅनमध्ये पेट्रोल डीझेल देत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी जळगाव-चांदवड रस्ता अडवला.

पेट्रोल-डीझेलचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. कॅन किंवा ड्रममध्ये पेट्रोल-डीझेल द्यायचे नाही, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. यानंतरही शेतकरी कॅन घेऊन पंपांवर पोहोचले. तिथे प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, कॅनमध्ये पेट्रोल-डीझेल देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. ट्रॅक्टर शेतावर असतात. ते पंपावर आणण्यासाठी वेगळे डीझेल लागते. त्यामुळे कॅनमध्येच डीझेल द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आमच्या शेतमालाला भाव नाही. तसेच जिथे-तिथे शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावे लागते, अशी व्यथाही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती ते शेगाव नाका रोडवर वाहतूक कोंडी

२० वर्षे आमदार राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड; राजकारणात शोककळा

Milk Cake Recipe: विकेंडला लहान मुलांसाठी घरीच बनवा मऊ, स्वादिष्ट मिल्क केक; वाचा सोपी रेसिपी

माजी मुख्यमंत्र्यांना आणखी एक मोठा धक्का; आता विश्वासू नेत्यानं दिला तडकाफडकी राजीनामा

Hair Care: केस दाट आणि मजबूत हवे आहेत? रोज खा 'हे' ७ पौष्टिक सुपरफूड्स, केस होतील कंबरेपर्यंत लांब

SCROLL FOR NEXT