nashik news  Saam Tv
Video

Manikrao Kokate: शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी; कृषीमंत्री कोकाटेंनी बळीराजालाच ऐकवलं; दिलेल्या पैशांनी तुम्ही पोरांचे साखरपुडा अन् लग्न लावतात, VIDEO

Minister Kokate to Farmers: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मागच्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे, अशातच त्यांनी आज एक अजब विधान केले आहे.

Omkar Sonawane

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांसह द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्याच्या बांदावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 एप्रिल रोजी झालेल्या पावसामुळे 1217 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 30 गावांतील 1255 हेक्टरवरील बागायती शेतीचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते तेथे त्यांच्यात आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून मंत्र्यांना जाब विचारला असता कोकाटे म्हणाले, तुम्हाला जे सरकारकडून पैसे येतात ते पैसे तुम्ही शेतीमध्ये गुंतवता का? इथे मीडियासमोर आहे मी जास्त बोलणार नाही पण तुम्हाला कर्जमाफी झाल्यावर जे पैसे येतात त्याची तुम्ही 1 रुपयाची तरी गुंतवणूक करता का? असा सवाल विचारला आणि शेती भांडवलीला तुम्हाला सरकार पैसे देणार पण तुम्ही विम्याच्या आलेल्या पैशांनी पोरांचे लग्न आणि साखरपुडे लावता असे वक्तव्य कोकाटेंनी शेतकऱ्यांसमोर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Remedies: आयुष्यात समस्या? तर मीठाशी संबधित 'हे' उपाय कराच, भाग्य उजळेल

Satish Shah Last Post : तुम्ही नेहमी...; विनोदी अभिनेते सतीश शाह यांची शेवटची पोस्ट व्हायरल

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

SCROLL FOR NEXT