Onion Import News SaamTv
Video

VIDEO : कांद्याचा वांदा कायम; कांदा आयातीवर नाराजी

Onion News : कांद्याची आयात न थांबवल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

Saam Tv

केंद्र सरकारच्या कांदा आयातीच्या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. कांद्याची आयात न थांबवल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

कांद्याचे दर स्थिर राहावे यासाठी सरकारने अफगाणिस्तान म्हणून कांदा आयात केला आहे. मात्र हा निर्णय चुकीचा असून राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा व कांद्याची आयात थांबवावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. सणासुदीच्या काळात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळणार आहेत. मात्र कांद्याची आयात झाल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळणार नाही. सध्या पंजाबमध्ये 300 टन कांदा आयात करण्यात आला आहे. सीमेवर अजून तब्बल 1500 टन कांदा देशातील बाजारपेठेत येण्यास तयार आहे. अफगाणिस्तानचा कांदा बाजारात आल्यास महाराष्ट्रातील कांद्याची मागणी घटणार आहे. त्यामुळे कांदा आयातीचा निर्णय सरकारने मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT