beed crime  saam Tv
Video

Beed Video: लाचखोरीला कंटाळून शेतकऱ्याचा संताप! थेट 50 लाख उधळले, नेमके प्रकरण काय?

Corruption Scandal: बीड जिल्ह्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लाचखोरी घेण्याचे काम सुरू आहे, यालाच वैतागून शेतकऱ्यांनी तब्बल 50 लाख रुपये उधळले आहे.

Omkar Sonawane

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात एका शेतकऱ्याने लाचखोरीविरोधात अनोखे आंदोलन केले. पंचायत समितीमध्ये विहीर किंवा घरकुल मंजुरीसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप करत, या शेतकऱ्याने चक्क ५० लाखांच्या नकली नोटा उधळत निषेध व्यक्त केला.

हा प्रकार आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात घडला आहे. संबंधित शेतकऱ्याने पंचायत समितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, योग्य ती कारवाई होत नसल्याने त्याने हा संतप्त निर्णय घेतला.

स्थानिक शेतकऱ्यांनीही पंचायत समितीत घरकुल मंजुरीसाठी खुलेआम पैशांची मागणी केली जाते, असे सांगत निषेध नोंदवला. यासोबतच, अशा प्रकरणांमध्ये वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

ही परिस्थिती केवळ पंचायत समितीपुरती मर्यादित नसून, महापालिका व अन्य सरकारी कार्यालयांमध्येही अशा प्रकारचे कारभार चालतात का? आणि हे कोणाच्या संगनमताने चालते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

Weekly Horoscope: मेष ते मीन राशींसाठी हा आठवडा कसा असणार? राशीनुसार काय खास घडणार ते वाचा

SCROLL FOR NEXT