Fake Paneer Seized in Nashik: Saam Tv
Video

Nashik News: पनीर खाणाऱ्यांनो सावधान! नाशिकमध्ये २३९ किलो बनावट पनीर जप्त; पाहा VIDEO

Fake Paneer Seized in Nashik: नाशिकमध्ये बनावट पनीरची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने तब्बल २३९ किलो बनावट पनीर जप्त करत नष्ट केले आहे. नागरिकांनी पनीर घेताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले जात आहे.

Priya More

नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल २३९ किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे. ४८ हजार रुपयांचे हे पनीर असून अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केले. नाशिकच्या सातपूर परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळामध्ये बनावट पनीर बाजारात विकले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पनीर घेताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाने नाशिकमध्ये आज मोठी कारवाई केली. नाशिकमध्ये शेकडो किलो बनावट पनीर अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आले. गुढीपाडवा आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या सर्च मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली. नाशिकच्या अंबड येथील साई इंटरप्राईजेस या कारखान्यावर छापा टाकत बनावट पनीर साठा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले हे पनीर निळी शाई टाकून नष्ट केले आणि थेट महापालिकेच्या घंटागाडीत टाकण्यात आले. २३९ किलोच्या या बनावट पनीरची किंमत ४७ हजार ८०० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मार्केटमध्ये असलेले पनीर खरेदी करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि तपासूनच ते खरेदी करावे असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Crime : सांगली हादरले; दहावीतील मुलीवर अत्याचार, पीडितेने घटनेनंतर संपविले जीवन, चार जण ताब्यात

Shocking: दत्तक घेतलं, जीवापाड जपलं; १२ वर्षीय हार्दीकला खेळताना गळफास लागला, आई-वडिलांनी फोडला टाहो

Panchgani Tourism: पावसाळ्यात अगदी शांत ठिकाणी जायचंय? पाचगणीतील 'या' Hidden spots ला भेट द्या

Street Style Gulab Jamun : शाळेच्या बाहेर मिळणारे गोड कुरकुरीत सुके गुलाबजाम कधी खाल्लेत का?

आमदार निवासाच्या कॅन्टिनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा; आज दोन वेटरांमध्ये तुंबळ हाणामारी| VIDEO

SCROLL FOR NEXT