Sakshi Sunil Jadhav
शाळेच्या बाहेर मिळणारे सुके गुलाबजाम बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
तांदूळ, उडीद, डाळ, बेकिंग पावडर, लाल फूड कलर, साखर इ.
तांदूळ, उडदाची डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून ३ तास भिजत घाला.
तांदूळ डाळ मिक्समध्ये घालून बॅटर तयार करून घ्या.
एका पातेल्यात १ कप साखर आणि पाऊन कप पाणी घालून ती विरघळवा. १ तरी पाक तयार करा.
आता पाक थंड झाल्यावर त्यात दोन थेंब लिंबाचा रस घाला.
पिठात बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा मिक्स करून घ्या.
खाण्याचा लाल रंग मिक्स करा. कढईत तेल गरम करा. आणि छोटे छोटे गोळे तळून घ्या.
गोळे लाल तळून घ्या आणि पाकात ठेवा. मग पाकातून गोळे काढून त्यावर साखर लावून घ्या.