Sakshi Sunil Jadhav
१० जुलै रोजी गुरु पौर्णिमा सगळ्या महाराष्ट्रात साजरी केली जाते.
गुरु पौर्णिमा ही गुरु वेद व्यासांचा जन्म म्हणून साजरी केली जाते.
आयुष्यात प्रत्येकालाच आपण कोणाला आपला गुरु बनवावा हा प्रश्न पडत असतो.
मुळात गुरु या शब्दाचा अर्थ 'अंधारातून प्रकाशाकडे नेणारा' असा आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक गुरु असला पाहिजे. जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल.
तुम्ही एखाद्या व्यक्तीला गुरु बनवताना तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतोय का याचे परिक्षण करा.
गुरु हा फक्त धार्मिक नाही तर शिक्षक, आईवडील, मार्गदर्शक असेही असतात.
मुळात जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळे गुण असतात ते आपल्याला वेचता आले पाहिजेत.
फक्त निष्फळ, कन्या दान, शिवालय बांधकाम, मंदिर बांधकाम, उपवास असे पुण्याचे काम केल्यानेच आयुष्यात यश मिळते असे नाही.