Sindhudurga News Saam Tv News
Video

Video: धक्कादायक प्रकार! तरूणीला लावलं मुदत संपलेलं सलाईन

सलाईन लावल्यानंतर त्या युवतीला त्रास जाणवू लागला याबाबत माहिती मिळताच शिरोडा सरपंचांसह ग्रामस्थांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Rachana Bhondave

वेंगुर्ल्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका 23 वर्षीय युवतीला वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये मुदत संपलेली सलाईन लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित युवतीचे नातेवाईक व ग्रामस्थ आक्रमक झाले. हे सलाईन लावल्यानंतर त्या युवतीला त्रास जाणवू लागला याबाबत माहिती मिळताच शिरोडा सरपंचांसह ग्रामस्थांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात मुदतबाह्य सलायन इंजेक्शनचा वापर रुग्णाला केल्या प्रकरणी कर्तव्यावरील अधिपरिचारिकेच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थ शांत झाले. तर या प्रकरणात शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सहाय्यक अधिसेविका, परिसेविका, व अधिपरिचारिका यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Scam : नाफेड कांदा खरेदीत ५००० कोटींचा घोटाळा? हायकोर्टाकडून चौकशीचे आदेश

Pune Air Quality : पुणेकरांनो काळजी घ्या! मुंबईपेक्षाही हवा झाली खराब, श्वसनाच्या आजारांना निमंत्रण

Male Infertility: मधुमेह वाढवतो पुरुष वंध्यत्वाचा धोका? शुक्राणूंच्या आरोग्यावर होणारे परिणाम समजून घ्या

Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?

Bor Fruits Benefits: थंडीत बोरं खाण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT