Maharashtra Assembly elections 2024 : रणजित कासलेने अटकेपूर्वी पुन्हा नवा दावा केलाय. विधानसभा निवडणुकीवेळी बँक खात्यात 10 लाख रुपये आल्याचा दावा कासलेने केलाय. मात्र कासलेला 10 लाख कुणी दिले. कासलेचे निलंबन खंडणीमुळे की खात्यात आलेल्या 10 लाख रुपयांमुळे? पाहूयात या रिपोर्टमधून..
ऐकलंत, धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी सुपारी दिल्याचा आरोप करणाऱ्या बडतर्फ पीएसआय रणजित कासलेनं आणखी एक खळबळजन आरोप केलाय....आता तुम्हाला प्रश्न पडले असेल की धनंजय मुंडेंनी कासलेला १० लाख रुपये नेमकं कशासाठी दिले असतील....नेमकं कोणतं प्रकरण मुंडेंना दाबायचं होतं.? तर हे आरोप थेट विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहेत...परळीतल्या ईव्हीएमसोबत छेडछाड होत असताना दूर राहण्यासाठी मुंडेंनी तब्बल १० लाख रूपये दिल्याचा आरोप करत कासलेनं धुरळा उडवून दिलाय.....
विधानसभा निवडणूकीच्या काळात बुथ ताब्यात घेण्याचा परळी पॅटर्न समोर आला होता. त्यानंतर आता कासलेनं मुंडेंच्या संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून आपल्या खात्यावर 10 लाख आल्याचा पुरावा दाखवलाय.. मात्र हा पुरावा खरा आहे का? कासलेच्या बोलण्यात किती तथ्य आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे. कारण कासलेच्या आरोपात तथ्य आढळलं तर केवळ धनंजय मुंडेच नव्हे...संपूर्ण महायुतीच्या विजयावर संशयाचं वादळ उठणार एवढं नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.