Pakistan saam tv
Video

Flight Route Change: पाकिस्तानला मोठा झटका ! युरोपियन विमानांनी मार्ग बदलला, पाकड्यांच्या डोक्यावरुन जाणं टाळलं|VIDEO

European Airlines Avoid Pakistani Airspace: जम्मू काश्मीर येथील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानमध्येच रचला गेला असे NIA च्या तपासात सिद्ध झाल्यानंतर युरोप देशात जाणाऱ्या सर्व विमानांनी आपला मार्ग बदलला आहे.

Omkar Sonawane

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर NIA (राष्ट्रीय तपास संस्था) च्या तपासात उघड झालं की, हा संपूर्ण कट पाकिस्तानमध्येच रचण्यात आला होता.

या तपासानंतर पाकिस्तानवर जगभरातून रोष व्यक्त होऊ लागला आहे. दहशतवाद्यांना पाठीशी घालणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख अधिकच ठळक झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आणखी एक मोठा आंतरराष्ट्रीय झटका बसला आहे. युरोपियन एअरलाईन्सनी पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर टाळण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतात येताना किंवा भारतातून युरोपला जाताना या एअरलाईन्स पाकिस्तानी आकाशातून उड्डाण करणार नाहीत.

लुफ्थांसा, ब्रिटिश एअरवेज, SWISS, ITA आणि LOT Polish Airlines या प्रमुख युरोपियन एअरलाईन्सने ही ठोस भूमिका घेतली आहे. Flightradar24 च्या माहितीनुसार, 30 एप्रिलपासून या बदलाची स्पष्ट नोंद दिसून आली आहे. तर 2 मेपासून काही एअरलाईन्सनी पूर्णतः पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi Photos: स्पृहाचं तेजस्वी रूप, हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT