राज्यात, महाराष्ट्र राज्य सरकारने "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सुरु करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. यावर आता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत (महिलांच्या बाबतीत २ वर्षांची सूट) जे आयकर भरत नाहीत, त्यांना देशातील विविध प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी या योजने मार्फत मिळेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) कडून यात्रेकरूंना विशेष ट्रेनने प्रवास, नाश्ता, भोजन आणि शुद्ध पिण्याचे पाणी, तीर्थक्षेत्रांवर राहण्याची व्यवस्था, आवश्यक असेल तेथे बसने प्रवास, तीर्थ यात्रेत गाईड, एकट्या ज्येष्ठ नागरिकाला केअर टेकर अशा सुविधा देऊन राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवू शकतो. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.