eknath Shinde on Abu azmi saam tv
Video

Eknath Shinde Slams Abu Azmi : अबु आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, एकनाथ शिंदे कडाडले, VIDEO

Abu Azmi on Aurangzeb Remarks : औरंगजेब कुशल प्रशासक होता असं म्हणणारे अबु आझमी टीकेची झोड उठल्यानंतर बॅकफूटला गेले आहेत. हे विधान मागे घेतो, असं ते म्हणालेत. पण सत्ताधारी अजूनही आक्रमक पवित्र्यात आहेत.

Nandkumar Joshi

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. आझमींनी औरंगजेबाला कुशल प्रशासक म्हणून संबोधले होते. या वक्तव्यावर सरकार आक्रमक झालं असून, त्यांचे निलंबन आणि त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. अबु आझमींनी स्पष्टीकरण आणि हे वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले असले तरी, सत्ताधारी अद्याप आक्रमक पवित्र्यात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या काळात माता-भगिनींवर अत्याचार झाले. सर्वसामान्य जनतेचा छळ केला गेला, अनेक मंदिरं तोडली. असा औरंगजेब कुशल प्रशासक कसा होऊ शकतो? त्याचे गुणगाण करणाऱ्या अबु आझमींचा धिक्कार करतो, असे शिंदे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा हे आपले दैवत आहेत. त्यांचा अवमान करणे हा राष्ट्रद्रोह आहे. काल देखील या प्रकरणात काही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आजही सभागृहात सांगितले आहे. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर कठोर आणि निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारचं मत सगळ्यांचं आहे. आझमींचे वक्तव्य निंदाजनक आहे, असेही शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT