“Eknath Shinde and Raj Thackeray during Ganeshotsav meeting – Shinde says, ‘Raj Ki Baat Raj Rehne Do’ Saam Tv
Video

Maharashtra Politics: राज की बात राज रहने दो; राज ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं सूचक विधान | VIDEO

Eknath Shinde Visits Raj Thackeray: एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. भेटीनंतर झालेल्या चर्चेबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, ‘राज की बात राज रहने दो’.

Omkar Sonawane

एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली.

शेतकऱ्यांसाठी चांगल्या पावसाची आणि भरघोस पीक येण्यासाठी प्रार्थना केली.

बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत शिंदेंनी मौन बाळगले; “राज की बात राज रहने दो” असा उल्लेख केला.

“कुटुंब एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे” असा सूचक टोलाही शिंदेंनी मारला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू देत, पीक चांगली येऊ देत अशी प्रार्थना केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाल्याचे विचारल्यावर शिंदे म्हणाले, दरवर्षी मी त्यांच्या घरी येतो, यंदा काही लोक त्यांच्या घरी आले. राज ठाकरेंच्या घरी नव्या लोकांना बघून आनंद झाला. अदखलपात्र लोक दखल घ्यायला लागले, कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेवर विचारले असता 'राज की बात राज ही रहने दो' असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेच रहस्य कायम ठेवलं. आमच्यात जी चर्चा झाली, ती खाजगीत राहू द्या, सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर सांगायच्या नसतात असे शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मराठा आंदोलनात गैरहजर? सहभागी न होणाऱ्या नेत्यांवर गावकीची नजर

Shukrawar Upay: शुक्रवारी 'हे' उपाय केल्याने होईल लक्ष्मी देवी प्रसन्न; आर्थिक समस्या होतील दूर

Todays Horoscope: 'या' राशींना आज जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल, पाहा राशीभविष्य

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

SCROLL FOR NEXT