शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एनडीएत यावं असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावर एकनाथ खडसे यांनी सूचक विधान केले आहे. ही भविष्याची नांदी असू शकते असे विधान खडसे यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटाला राम राम केला आहे. लवकरच खडसे भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. खडसे म्हणाले की मोदींनी जे विधान केले आहे त्याचा नेमका अर्थ कळालेला नाही. कदाचित भविषय काळातील ती नांदी असावी, या विधानातून पुढची रणनीती ठरवण्याचा त्यांचा उद्देश असावा असेही खडसे म्हणाले. तसेच काही लोकांनी माझ्याविषयी नाराजी व्यक्त केल्याने पक्ष प्रवेश रखडला आहे असेही खडसे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.