Dharmendra Pradhan Saam Tv
Video

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?, ओम बिर्लांची घेतली भेट

Dharmendra Pradhan Meets Om Birla: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. ते सध्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

Priya More

दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. गेल्या १० मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरु आहेत. विरोधकांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता विरोधकांनी पाठिंबा दिला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवशेनामध्ये विरोधकांकडून सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांच्या गदारोळानंतर गेल्या २ दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब केले जात आहे. दोन्ही सभागृहाचे काम सुरळीत होत नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर किरण रिजेजू यांनी लोकसभेत भूमिका मांडली की नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर धर्मेंद्र प्रधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या भेटीला गेले आहेत. आता या चर्चेनंतर सरकार पुन्हा चर्चा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT