medical services  Saam tv
Video

Medical Education Scam : मेडिकल शिक्षण क्षेत्राला हादरवणारा घोटाळा, महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये कॉलेजांवर धाड

ED Raids Medical Colleges in Multi-Crore Inspection Bribery Scam : देशातील मेडिकल शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा उघडकीस आला असून ईडीने महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांवर छापे टाकले आहेत.

Namdeo Kumbhar

Medical Education Scam Exposed: देशातील मेडिकल शिक्षण क्षेत्राला हादरवणारा घोटाळा उघडकीस आला आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांना तपासणीची आगाऊ माहिती देऊन कोट्यवधींची लाचखोरी करणाऱ्या रॅकेटवर ईडीने कारवाई केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह नॅशनल मेडिकल कमिशनकडून होणाऱ्या ह्या गैरप्रकारमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ईडीने महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये 15 ठिकाणी छापे मारले आहेत. यात विविध राज्यांतील 7 वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीने केलेल्या या कारवाईनंतर देशातील मेडिकल शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ईडीला महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तपासणीची आगाऊ माहिती देण्यासाठी कोट्यवधींची लाच घेतल्याचा गंभीर आरोप. एनएमसी आणि आरोग्य मंत्रालयाशी संबंधित मोठे गैरप्रकार समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early signs of stroke: शरीरात ही ५ लक्षणं दिसली तर समजा स्ट्रोक येऊ शकतो; संकेत ओळखून करा उपाय

Election: निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना मोठा दिलासा, निवडणुकीच्या प्रचारासाठी मुदत वाढवली

Maharashtra Live News Update: संजय राऊतांची तोफ पुन्हा धडाडणार, सोमवारी साधणार संवाद

Adv Suraj More : कोकणातल्या लेकाची अभिमानस्पद कामगिरी! सूरज मोरेची जिल्हा न्यायाधीशपदी निवड

Dry Skin Remedies: हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय, हे ५ घरगुती ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT