America News SaamTv
Video

Donald Trump : अमेरिकेतल्या १८ हजार भारतीयांवर घरवापसीची टांगती तलवार | VIDEO

Trump Government On Action Mode : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच अनेक निर्णय घेतले असल्याने आता १८ हजार भारतीयांना पुन्हा मायदेशी पाठवलं जाणार असल्याचं समजत आहे.

Saam Tv

राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरावर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तब्बल १८ हजार भारतीय अमेरिकेतून पुन्हा भारतात पाठवले जाणार आहेत. अमेरिकेत एकूण १० कोटी १० लाख लोकं बेकायदेशीरपणे राहतात असा अहवाल आहे. तर ७.२५ लाख भारतीय बेकायदा राहतात असा अंदाज आहे. आता याच बेकायदा लोकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची तयारी सुरू झाली असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता अशा भारतीयांवर घरवापसीची टांगती तलवार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता ट्रम्प अॅक्शन मोडमध्ये आल्याचं बघायला मिळत आहे. एकीकडे जन्मजात दाखल्याच्या आधारावर अमेरिकेचं रहिवासी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार रद्द करण्यात आला आहे. तर आता बेकायदा स्थलांतरीतांना देखील मायदेशी पाठवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. त्यामुळे १८ हजार भारतीयांची अमेरिकेतून घरवापसी होणार असल्याचं बघायला मिळत आहे. अमेरिका आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यातच भारतीयांना धक्का देणारे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले आहे. त्यामुळे याचा परिणाम काय होईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोबीच्या शेतात सापडला तरूणीचा रक्तानं माखलेला मृतदेह; 'असं' सुटलं हत्येचं कोडं

Maharashtra Politics: अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची धावत्या ट्रेनसमोर आत्महत्या; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याची माहिती

Kalyan News : महायुतीत बॅनर युद्धाचा भडका! "कोण आहे विकासाचे स्पीडब्रेकर?" भाजपची शिंदे गटावर खोचक टीका

Maharashtra Live News Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

Ticket To Finale Winner: 'या' स्पर्धकाची BB19 च्या ग्रँड फिनालेमध्ये डायरेक्ट एन्ट्री; मिळाली खास पॉवर

SCROLL FOR NEXT