Dombivli AC Local Saam Tv
Video

Dombivli AC Local: लोकलचे दरवाजे बंद करण्याची घोषणा अन् २४ तासात डोंबिवलीत AC ट्रेनचा दरवाजा लागेना| VIDEO

Dombivli AC Local Video: काल मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर आज पुन्हा डोंबिवलीत एसी लोकलमध्ये खूप गर्दी झाली होती. यामुळे लोकलचे दरवाजेदेखील बंद होत नव्हते.

Siddhi Hande

काल कल्याणहून सीएसएमटी स्थानकाकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. दोन लोकल एकमेकांना घासल्या. त्यामुळेच बाहेर लटकलेले प्रवासी खाली पडले. यात काहीजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडून गेल्यानंतरही अजूनही रेल्वे प्रशासनाला जाग आलेली नाही. आता एसी लोकलचे दरवाजे बंद होत नाहीयेत.आज डोंबिवली येथे एका एसी लोकलचा दरवाजा तब्बल १० मिनिटे उघडाच होता. प्रवाशांच्या गर्दीमुळे हा दरवाजा बंद होत नव्हता. आज सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांनी निघणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. कालच्या घटनेनंतर सर्वच लोकलचे दरवाजे बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता जर प्रवाशांच्या गर्दीमुळे लोकलचे दरवाजेच बंद होणार नसेल तर याचा काहीच फायदा नाही. आरपीएफच्या जवानांनी जेव्हा प्रवाशांना खेचून बाहेर काढले त्यानंतर या एसी लोकलचे दरवाजे बंद झाले. तब्बल १० मिनिटे ही ट्रेन तिथेच उभी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT