beed news  saam tv
Video

Beed National Highway: माजी मंत्री-आमदारांच्या गावातच रस्त्यांची दुरावस्था; शेकडो गावांचा संपर्क असलेल्या महामार्गावरील पुलाचं काम ठप्प |VIDEO

10 Years, No Bridge: माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बीड तालुक्यातील नवगण राजुरी या मूळ गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील डोंबरी नदीवरील पुलाचे काम गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बीड तालुक्यातील नवगण राजुरी या मूळ गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील डोंबरी नदीवरील पुलाचे काम गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची देखील दुरावस्था झालेली आहे. यामुळे प्रवाशांना पाऊस पडल्यानंतर नदीच्या गुडघाभर पाण्यातुन आणि चिखलातुन प्रवास करावा लागतो.

बीड ते खरवंडी कासार जोडल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील नवगण राजुरी येथील पुलाचे काम गेल्या दहा वर्षांपूर्वी सुरु झाले होते तर रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे.

मात्र सद्यस्थितीला गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. शंभरहून अधिक गावांना जोडला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. याच महामार्गावरील डोंबरी नदीवरील पुलाचे काम देखील गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबितच आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गावातील ही परिस्थिती असेल तर मतदार संघात काय परिस्थिती असेल हे यावरून स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT