Diesel Prices  Saam Tv
Video

Diesel Price: डिझेलच्या दरात वाढ होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Government Hikes Diesel Export Duty: केंद्र सरकारने हाय-स्पीड डिझेलवर निर्यात शुल्क २४ रुपये प्रति लिटर आणि इन्फ्रा सेस ३६ रुपये प्रति लिटरने वाढवला आहे. त्यामुळे डिझेलच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

Priya More

केंद्र सरकारने देशांतर्गत इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्राने हाय-स्पीड डिझेलवर निर्यात शुल्क २४ रुपये प्रति लिटर आणि इन्फ्रा सेस ३६ रुपये प्रति लिटरने वाढवला आहे. सरकारने या आधीही २६ मार्च रोजी डिझेलवर २१.५० प्रति लिटर आणि एटीएफवर २९.५ प्रति लिटर निर्यात शुल्क लावले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा ही वाढ करण्यात आली आहे. डिझेलवरील निर्यात शुल्क २१.५ रुपये प्रति लिटरवरून ५५.५ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. निर्यात शुल्कामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे आता डिझेलच्या दरामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आर्थिक समस्या सुटणार, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार

राज्यातील कारागृह सुरक्षा व्यवस्थेची ऐशीतैशी; अधिकारी-कैद्यांची एकत्र दारू पार्टी

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

SCROLL FOR NEXT