बुलढाण्यात डीझेलसाठी शेतकरी कॅन घेऊन पंपावर धावत सुटले saam tv
Video

डीझेलसाठी शेतकऱ्यांची धावाधाव; हातात कॅन घेऊन पेट्रोलपंपाकडे पळत सुटले, VIDEO

diesel shortage forces farmers to rush to petrol pumps : देशात पेट्रोल आणि डीझेलचा पुरेसा साठा असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत असलं तरी, प्रत्यक्षात डीझेलची टंचाई असल्याचे समोर आले आहे. डीझेलसाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरू असल्याचे विदारक दृश्य लोणारमध्ये दिसून आलं.

Nandkumar Joshi

संजय जाधव , बुलढाणा | साम टीव्ही

देशात पेट्रोल-डीझेलचा पुरेसा साठा आहे, असं सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र, बुलढाण्यातील लोणारमध्ये इंधन टंचाईचे चटके शेतकऱ्यांना सोसावे लागत असल्याचे दिसते. डीझेल टंचाईमुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. लोणार शहरात परिस्थिती अधिकच गंभीर आहे. अनेक पेट्रोल पंपांवर तासनतास रांगा लागत आहेत. जिथे डीझेल मिळेल तिथे शेतकरी धाव घेत आहेत. सध्या शेती मशागतीची अत्यंत महत्त्वाची वेळ असताना डीझेलअभावी ट्रॅक्टर आणि शेतीची अवजारे बंद पडली आहेत. परिणामी शेतातील मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून आगामी १० दिवसांनंतर होणारी पेरणीही धोक्यात आली आहे. एकीकडे पावसाच्या तोंडावर शेतकरी तयारीत असताना दुसरीकडे डीझेल टंचाईने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. जिल्हाभर डीझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागात चिंतेचं वातावरण आहे. प्रशासन आणि सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. शेती करायची कशी आणि पेरणीची तयारी करायची कशी?” असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत. कमळजा पेट्रोल पंपावर हातात कॅन घेऊन धाव घेणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे पेट्रोल-डीझेल टंचाईचं भीषण वास्तव समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhar- Bank Linking Update: आधार कार्ड संबंधित हे १ काम करा, अन्यथा गॅस सब्सिडी, पेन्शन, PM किसान योजनेचे पैसे होणार बंद

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात, वादळी वाऱ्यासह बरसल्या पावसाच्या सरी

बिश्नोई गँगच्या 3 शार्पशूटरांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गायकाच्या हत्येचे कनेक्शन

मनोज जरांगे पाटलांच्या अडचणीत वाढ? कोट्यवधींची जमीन खरेदी; अजय महाराज बारस्करांचे गंभीर आरोप

Overhydration: गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT