ainwater Pouring Inside ST Bus in Dhule Saam Tv
Video

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

Rainwater Pouring Inside ST Bus in Dhule: अवकाळी पावसाचा फटका लालपरीला बसला. धुळ्यामध्ये एसटी बसला गळती लागली. पावसाच्या पाण्यात भिजत प्रवाशांना प्रवास करावा लागला. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

धुळ्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. आज संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. लालपरीला अक्षरश: गळती लागली. पावसाचे पाणी एसटी बसमध्ये पडते होते त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. यामुळे लांबपल्ल्याच्या एसटी बसेसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघडकीस आली. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

शहादा- नाशिक ही बस धुळ्यामार्गे जात असताना दोंडाईचा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे संपूर्ण बस गळत होती. यामुळे प्रवाशांना बसमध्ये बसूनही पावसाच्या पाण्यापासून आपला बचाव करण्याची वेळ आली. संपूर्ण बस गळत असल्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे ओल्या सिट्सवरच बसू त्यांना प्रवास करावा लागला. एसटीच्या छतातू गळत असलेल्या पावसाच्या धारामुळे ओलचिंब होत प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. ग्रामीण भागातील बसेसची अवस्था सुधारणार तरी कधी? असा प्रश्न प्रवाशांनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Water Supply: ठाण्यात पाणीकपातीचं संकट! 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका बसणार? पाहा यादी...

Maharashtra News Live Update: - नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंप वर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचे फलक

falta repoll news : पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; मतदानाआधीच फलतामधून TMC उमेदवाराची माघार

Surya Namaskar For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी किती वेळा सूर्यनमस्कार केल्याने फायदा होतो?

Dream meaning: तुम्हालाही वारंवार एकच स्वप्न पडतंय का? स्वप्नशास्त्रात सांगितलेत यामागचे गूढ संकेत

SCROLL FOR NEXT