Bhagyashree Atram Join Sharad Pawar Group SaamTv
Video

Bhagyashri Atram : ''धर्मरावबाबा नक्षलांच्या तावडीत होते तेव्हा.. ''; तुतारी फुंकताच भाग्यश्री आत्राम यांचा खुलासा

Maharashtra Political News : भाग्यश्री आत्राम यांनी तुतारी फुंकताच वडिलांवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे विधानसभेला वडील - विरुद्ध लेक असा सामना रंगेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Saam Tv

"मी घर फोडून जात नाहीये, धर्मरावबाबा हे नक्षलांच्या तावडीत होते. तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे. बाबावरील फिल्ममधे त्यांनी कबूल केले आहे. मी शरद पवार यांचे ऋण विसरू शकत नाही." असे म्हणत धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम गुरुवारी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. आज मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

दरम्यान, शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या वडिलांवरच हल्लाबोल केला. ''अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. आपले मंत्री साहेब येतात आणि जातात, समस्यांकडे दुर्लक्ष करतात,'' असं म्हणत भाग्यश्री यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत त्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्या वडिलांविरोधात निवडणूक लढू शकतात, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण डीसीपी स्कॉडची कारवाई! दोन एमडी तस्करांना बेड्या, 22 लाखांचे एमडी ड्रग्स जप्त

Dharashiv News: अरे देवा! विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या छत्र्या शिवसेना कार्यकर्त्यांनीच पळवल्या|Video

Shravan Importance: श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातील या वस्तू बाहेर काढा,अन्यथा...

'आई-बाबा, माझा मृतदेह घरी आणल्यावर मला मिठीत घ्या..' तरूणीनं बँकेतच आयुष्य संपवलं; चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

Pune Crime : पुणे हादरलं! पाठलाग केला, जबरदस्तीने जंगलात नेलं अन्...; महिलेसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT