Sabalevadi Pazar Dam Burst Floods Farmland, Leaving Crops Destroyed Saam Tv
Video

धाराशिव साबळेवाडी पाझर तलाव फुटला, शेतकऱ्यांचा मोठा फटका|VIDEO

Sabalevadi Pazar Dam Collapse: धाराशिव जिल्ह्यातील साबळेवाडी पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली. शेतकरी मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जात आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाई व स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साबळेवाडी येथे पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. तलाव फुटल्यानंतर शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून उभं पीक मातीमोल झालं आहे. या दुर्घटनेमुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात दगडगोट्यांचा खच झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या पाईपलाईन उघड्या पडल्या असून अनेक विहिरी बुजल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तलावाची गुणवत्ता योग्यप्रकारे तपासली गेली नाही, त्यामुळेच ही फूट झाली, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. घटनेची चौकशी स्वतंत्र समितीमार्फत करावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेरूचे भाव गडगडले, शेतकऱ्यांचे गणित कोलमडले; पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात|VIDEO

Maharashtra Live News Update: जालन्यातील अंबड तालुक्यातील बळेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस

Pune Accident : नियंत्रण सुटलं, डंपर थेट घरात शिरला; ऐनवेळी चालकाने स्टेरिंग फिरवली अन्...

EPFO News: EPFO सदस्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी 5 मोठे निर्णय

Guava Ice Cream Recipe : घरी पेरू आईस्क्रीम बनवताय? फॉलो करा 'ही' रेसिपी

SCROLL FOR NEXT