Deputy CM Devendra Fadnavis addressing a public event in Phaltan, reacting to the tragic woman doctor suicide case. Saam Tv
Video

एवढीशी जरी शंका असती तर... फलटण आत्महत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वपूर्ण विधान|VIDEO

Phaltan Hospital Woman Doctor Suicide Controversy: फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढीशी जरी शंका असती तर मी हा कार्यक्रम रद्द करून आलो नसतो असं ते म्हणाले.

Omkar Sonawane

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षिक गोपाळ बदने हा काल रात्री पोलिसांना शरण आला. आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे देखील नाव घेतले जात आहे. या संगळ्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फलटणमध्ये आज विविध विकसकामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले,परवा आमची एक लहान बहीण जी डॉक्टर होती, ज्यांचा अतिशय दुर्दैवीपणे मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. ही आत्महत्या करताना हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तत्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटकही केली आहे. त्यातील सर्व सत्य बाहेर येत आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय घेतला आहे.

अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचे, अशाप्रकारच्या निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. काहीही कारण नसताना रणजित दादा, सचिन दादांचे नाव यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती तर मी हा कार्यक्रम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Tumor: 'ही' लक्षणं साधी नसून असू शकतात ब्रेन ट्युमरचे संकेत

Amruta Khanvilkar Photos: ओठावर लाली अन् दिसायला भारी, अमृताचे फोटो पाहून तरूण घायाळ

Shrivardhan : समुद्रकिनारा, मंदिरे अन् निसर्गरम्य वातावरण; श्रीवर्धनला गेल्यावर काय काय पाहावे?

ये भैय्या अन् भाभी, औकातीत राहायचं; दिवाळीचा फराळ पाहून यशोमती ठाकूर संतापल्या, नेमका काय आहे प्रकार|VIDEO

Maharashtra Live News Update: PSI गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT