Nagpur News SaamTv
Video

Devendra Fadnavis : ठरलं! देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री? शपथविधीसाठी खास जॅकेट तयार | Video

Nagpur News : राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालं आहे. त्यासाठी नागपुरात त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी खास जॅकेट शिवून तयार करण्यात आले आहेत.

Saam Tv

देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्र्यांसाठी खास जॅकेट नागपूरमध्ये शिवण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे महापौर असल्यापासून नागपूरच्या गोविंदा कलेक्शन या दुकानातून जॅकेट शिवून घेतात. फडणवीस यांना निळा रंग जास्त आवडतो. त्यामुळे गोविंदा कलेक्शनच्या पिंटू नेहाडिया यांनी निळ्या रंगाच्या तीन शेड्समध्ये जॅकेट शिवले आहेत. यातलं एक जॅकेट देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना घालण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे. देवेंद्र फडणवीस जे कोट घालतात ते खास नागपुरात शिवले जातात. त्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी सुद्धा गोविंदा कलेक्शनच्या पिंटू नेहाडिया यांनी फडणवीस यांना आवडणाऱ्या निळ्या रंगाचे 3 कोट तयार केले आहेत. त्यातील एक कोट त्यांनी घालावा अशी त्यांची इच्छा आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan : २ लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

Maharashtra News Live Update: मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा

Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात महत्वाचा बदल; ताशी १६० किमी वेगाने होणार प्रवास, कसा असेल संपूर्ण लोहमार्ग?

यंदा 'फादर्स डे' कधी आहे? वडिलांना खूश करणाऱ्या 3 बेस्ट आयडिया

Diabetes: औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज 15 मिनिटं करा हे रुटीन फॉलो, लगेचच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT