CM Devendra Fadnavis explains Maharashtra’s fiscal position, stating that the ₹9.32 lakh crore debt is manageable compared to the state’s expanding economy. Saam Tv
Video

राज्यावर ९.३२ लाख कोटींचं कर्ज; पण ते चिंताजनक नाही, देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं अर्थगणित|VIDEO

Devendra Fadnavis Explains: महाराष्ट्रावर ९.३२ लाख कोटींचं कर्ज आहे, मात्र राज्याची ४५ लाख कोटींची अर्थव्यवस्था पाहता हे चिंताजनक नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळ माध्यम समूहाला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवर आणि राजकीय विषयांवर भाष्य केले. राज्यावर सध्या ९.३२ लाख कोटी रुपयांचे कर्ज असून व्याजापोटी बजेटमधील ११ टक्के रक्कम खर्च होत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, हे कर्ज राज्याच्या ४५ लाख कोटींच्या विशाल अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चिंताजनक नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कर्जाचा आकडा ॲब्सोल्यूट नंबरमध्ये न बघता तो अर्थव्यवस्थेच्या आकाराशी पडताळून पाहावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

२०१२-१३ मध्ये ४ लाख कोटींचे कर्ज असताना अर्थव्यवस्था १२ लाख कोटींची होती. याकडे त्यांनी लक्ष वेधले. विकसनशील अर्थव्यवस्थेत महसूल तूट असतेच, पण विकासासाठी कर्ज घेणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही प्रॉडक्टिव्ह कर्ज घेत असून त्यातून राज्याची अर्थव्यवस्था विस्तारत आहे असे सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. स्मार्ट आणि एफिशिएंट खर्चावर भर दिल्यास राज्याची प्रगती होईल आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्‍यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन

SCROLL FOR NEXT