Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing the media over the political controversy surrounding Ajit Pawar’s plane crash death. Saam Tv
Video

एखाद्याच्या मृत्यूचेही राजकारण...फडणवीस ममता बॅनर्जींवर संतापले|VIDEO

Politics Over Ajit Pawar Death Fadnavis Slams Mamata: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनावरून राजकारण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात निधनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली चौकशीची मागणी करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांची ही भूमिका दुर्दैवी असून, ही एक वैयक्तिक राजकारणासाठी वापरण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

बुधवारी एएनआयशी बोलताना फडणवीस म्हणाले, की ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आधीच हा अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे आणि या दु:खद घटनेवर राजकारण करू नये. एखाद्याच्या मृत्यूचे घाणेरडे राजकारण केले जात आहे हे अत्यंत निंदनीय वेदनादायक आहे. महाराष्ट्राच्या अत्यंत जवळच्या आणि प्रिय नेत्याच्या निधनावर राजकारण करणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान काही नेत्यांनी अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली असली तरी शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हणाले, यामध्ये कुठलेही राजकारण नसून हा एक अपघात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT