devendra fadanvis saam tv
Video

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बळीराजाला मिळणार 12 तास मोफत वीज, फडणवीस काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Wardha News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अनेक वर्षांचा शेतकऱ्यांचा वनवास हा आता संपुष्टात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.

Omkar Sonawane

चेतन व्यास, साम टीव्ही

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून १६००० मेगावॅट क्षमतेच्या विजेची तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले, मागील काळात आम्ही जाहीर केले होते की, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज दिली जाईल. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली होती. आज मला आनंदाने सांगता येते की या १६००० मेगावॅट विजेच्या क्षमतेसाठीचे काम सुरू झाले आहे. ते वर्धा येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, २०२६ च्या डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ८० टक्के भागामध्ये आमचे शेतकरी दिवसा १२ तास वीज वापरू शकतील. त्यांना रात्रीच्या विजेची गरज भासणार नाही. आणि विशेष म्हणजे ही वीज शेतकऱ्यांना मोफत दिली जाणार आहे. हा आमचा निर्धार आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतीच्या उत्पादकतेतही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT