Devendra Fadanvis NEws SaamTv
Video

VIDEO : 'देवा भाऊ जो बोलता है वो करता है..'; फडणवीसांची रावडी डायलॉगबाजी

Devendra Fadanvis : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान अवताडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यातून बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या डायलॉगबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Saam Tv

''देवा भाऊ जो बोलता है वो करता है..'' असं म्हणत मंगळवेढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार डायलॉगबाजी केलेली दिसली. मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटातील डायलॉग व्यासपाठीवरुन म्हटला. त्यावेळी, उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवत दाद दिली. ''देवाभाऊ जो बोलता है वो करता है, और जो नही बोलता वो डेफिनेटली करता है .. '', असा सिनेस्टाईल डायलॉग देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्यांच्या या डायलॉगचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान अवताडे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला दुष्काळी 24 गावांसाठी पाणी दिलं. सातारा जिल्ह्यातील दुष्काळ संपवून दाखवला. सांगोला उपसा सिंचन योजनेतून संगोल्याच्या 50 हजार हेक्टर जमिनीला लाभ झालाय. आता मंगळवेढा येथील 17 हजार हेक्टर जमिनीचा फायदा होत आहे. अनेकजण मला विचारतात तुम्ही पाणी कोठून आणलं, जिद्द असेल तर पाण्याचा थेंब थेंब वाचवून पाणी उपलब्ध केलं, असं फडणवीसांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT