Eknath Khadse And Devendra Fadnavis Saam Tv
Video

Eknath Khadse: प्रवेशाचा मुहूर्त ठरला? भाजपचं निमंत्रण एकनाथ खडसे स्वीकारणार?

Maharashtra Politics: भाजप प्रवेशासाठी ताटकळत थांबावं लागलेल्या खडसेंचा संयमाचा बांध फुटलाय. भाजपमध्ये अधिकृत प्रवेश न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केलाय. तर भाजप नेतृत्वाने खडसेंना ग्रीन सिग्नल दिलाय. त्यामुळे खडसेंचा भाजप प्रवेश चर्चेत आलाय.

Saam Tv

भरात मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीच्या आधी शरद पवारांना सोडून भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंना अजूनही भाजपचं अधिकृत दार उघडलं नाही. त्यामुळे एकनाथ खडसे चांगलेच संतापले आहेत. त्यातच खडसेंनी शरद पवारांच्या पक्षातच राहण्याचे संकेत दिलेत.

लोकसभेला 4 महिने झाल्यानंतरही भाजपात अधिकृत प्रवेश न झाल्याने खडसेंनी राज्यातील नेतृत्वावर टीका केलीय. मात्र गणेशोत्सवानंतर खडसेंचा पक्षप्रवेश होण्याचे संकेत फडणवीसांनी दिलेत. दुसरीकडे गिरीश महाजनांनी खडसेंच्या प्रवेशावरून खोचक टोला लगावलाय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, गणेशोत्सवानंतर खडसेंबाबत निर्णय घेऊ.

लोकसभा निवडणूकीत सून रक्षा खडसेंना निवडून आणण्यासाठी एकनाथ खडसेंनी भाजपची वाट धरली आणि प्रवेशाच्या चर्चेचा धुरळा उडवला. आता त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या खुद्द फडणवीसांनीच खडसेंच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिलाय...त्यामुळे खडसे खरंच भाजपात प्रवेश करणार की आता मुलीचा विधानसभेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी पुन्हा तुतारी फुंकणार याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT