Rohit Pawar addresses the media after shocking gunfire incident in Daund; demands immediate action against the accused. Saam Tv
Video

Rohit Pawar: महायुतीच्या एका आमदाराचा कलाकेंद्रात अंदाधुंद गोळीबार, एक महिला गंभीर जखमी, रोहित पवारांचा गंभीर आरोप|VIDEO

MLA’s Brother Involved In Firing: दौंडमधील एका कला केंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याने एक महिला जखमी झाली. रोहित पवारांनी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

पुणे: दौंड तालुक्यातील एका कला केंद्रामध्ये सोमवारी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुण जखमी झाल्याची समोर येत आहे. यावरच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.

दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत #अनंत_कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अलर्ट

Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Mobile Tips: तुमचा जुना फोन होईल अगदी नवीन, फॉलो करा 'हे' सोपे टिप्स

Nagpur News : बस अडवून खिडकीवर चढला, प्रवाशांना मारहाण; अर्धनग्न होत तरुणाचा भररस्त्यात राडा, शेवटी....

बिबट्या दबक्या पावलांनी शिरला गोठ्यात, शिकारीवर झडप टाकणार तेवढ्यात शेतकऱ्याने शिकवला धडा

SCROLL FOR NEXT