Crop Insurance Fraud SaamTv
Video

Crop Insurance : पिकविमा गैरव्यवहार; ४ लाख ५ हजार बनावट अर्ज रद्द होणार | VIDEO

Fraud In Crop Insurance : बोगस पिकविमा दाखल करण्यात आलेल्या ४ लाख अर्जासह महा ईसेवा केंद्रांवर कारवाई होणार आहे. यातले सर्वाधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातील असल्याचं उघडकीस आलं आहे.

Saam Tv

राज्यात चर्चेत असलेल्या पिकविमा गैरव्यवहाराबाबत आता कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.

खरीप हंगामात झालेल्या पिकविमा गैरव्यवहाराबाबत अनेक दिवसांपासून आरोप केले जात असतानाच आता याबद्दल अखेर कृषी विभागाने कारवाईचे आदेश जारी केलेले बघायला मिळत आहे. पिकविम्यासाठी गेल्या वर्षी खरीपाच्या हंगामात दखल झालेले ४ लाख ५ हजार बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यातले १ लाखांपेक्षा जास्त अर्ज एकट्या बीड जिल्ह्यातले आहेत. बोगस पिकविम्याच्या परळी पॅटर्नवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील अनेक आरोप केले आहेत. ९६ महा ई-सेवा केंद्रांनी मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्यावरती आता फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र कृषी विभागाचे दोषी अधिकारी आणि विमा कंपनी याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Famous Singer : प्रसिद्ध गायक झाला बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा, ५ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ

Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT