Beed News  Saam Tv
Video

Beed: बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, दगडाला बांधून कॉप्या टाकतानाचा VIDEO व्हायरल

Copy Free Campaign Fails in Beed: बीडमध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचा प्रकार समोर आला आहे. दगडाला बांधून कॉप्या वर्गामध्ये टाकतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

बीडमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कॉपीमुक्त अभियानाचा बीडमध्य फज्जा उडवला जात आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेरून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्या जात आहेत. चक्क शिक्षकांकडून कॉप्यांचा गठ्ठा जाळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याचसोबत दगडाला बांधून काप्या टाकतानाचा देखील व्हिडीओ समोर आला आहे. हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

बीडच्या गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे दगडाला बांधून कॉफी टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कॉपी मुक्त अभियान राबवले आहे, प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत असे असताना देखील कॉप्यांचा हा प्रकार घडताना दिसत आहे. बीडमध्ये परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाची वतीने यासंदर्भात काय दखल घेतली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडमध्ये ३०० हून अधिक परीक्षा केंद्र आहेत तर ४० हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शिक्षक देखील यामध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सॅलरी,रजा आणि पेन्शन...आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Lalit Prabhakar: प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता महिनाभर अंथरुणाला खिळून होता, नेमकं काय झालं होतं?

Friday Horoscope: जोडीदारासोबतचे वाद मिटतील, नव्या कामातून पैसा मिळेल; या ५ राशींना लागणार आज लॉटरी

वडील तंत्र-मंत्र करायचे का? भेटायला कोण कोण यायचं? खरातच्या मुलाला SIT ने काय काय प्रश्न विचारले?

SCROLL FOR NEXT