सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली व शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. केसरकर माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत मात्र त्या माणसाचा उपयोग या मतदारसंघाला होणार नसेल तर आम्ही युती म्हणून त्यांना मदत केली तर सावंतवाडीची जनता आम्हाला माफ करणार नाही. ते 15 वर्ष आमदार, 8 वर्षे मंत्री तरी या मतदारसंघात काही केल नाही. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना केल्याची माहीती राजन तेली यांनी दिली आहे.
आज चांगला दिवस आहे कशाला कोणाचं नाव घेता अस म्हणत त्यांना सर्व सामान्य लोकांशी काही देणघेण नाही त्यांचे लक्ष दुसरीकडे आहे असा टोला राजन तेलींच नाव न घेता केसरकर यांनी लगावला आहे. फक्त मी केलेल्या कामाच्या ठीकाणी नारळ फोडणे येवढच काम राजन तेलींनी केलं असा जोरदार पलटवार दिपक केसरकर यांनी राजन तेलींवर केला आहे. पाहूयात राजन तेली व दिपक केसरकर काय म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.