Maharashtra Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics : राज्यात मतदार यादी घोटाळा? 'मतदारांची नावं वगळण्याचा कट', भाजपवर मविआचे गंभीर आरोप

MVA Vs Mahayuti : महायुतीकडून मतदार यांद्यामध्ये घोळ केला जात असल्य़ाचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय. मतदारांची नावं वगळण्याचा कट केल्याचा आरोप मविआ नेत्यांनी केलाय. पाहूया एक रिपोर्ट.

Tanmay Tillu

राज्यात महाविकास आघाडीच्या मतदारसंघातून पाच ते दहा हजार नावे कमी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केलाय..मतदार यादीमधून नावे गहाळ होण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला..

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीनं राबवलेल्या योजनांची माहिती घराघरात पोहचवण्यासाठी योजना दुतांची नेमणूक केलीये. यावरुनही मविआनं आगपाखड करत योजना दूतांची निवडणुक आयोगानं चौकशी करावी अशी मागणी केलीये. दुसरीकडे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती व त्यांना दिलेली मुदतवाढ ही असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहे. त्यांना हटवण्याची मागणी काँग्रेसने केली. मविआनं तक्रारींचा पाढा वाचत भाजपला आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलंय.. त्यामुळे निवडणूक आयोग मविआच्या तक्रारींची दखल घेणार का हेच पाहायचं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

Black Neck Removal Tips: मानेवरचा काळेपणा कसा घालवायचा? या 3 सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT